भेसळमाफियावर कारवाईसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

February 2, 2011 2:17 PM0 commentsViews: 7

02 फेब्रुवारी

मनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाने महाराष्ट्राला हादरा बसला. यानंतर खडबडुन जागे झालेल्या शासनाने राज्यभरात धाडसत्राची कारवाई सुरू केली. तर भेसळमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलं. यावेळी सीबीआय चौकशीची केली मागणी तसेच राज्यातील माफियांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी सुधीर मुंनगंटीवार आणि गिरिश महाजनही या वेळी उपस्थित होते.

close