त्र्यंबकेश्वरमध्ये बनावट नोटा छापणार्‍या साधूला अटक

February 2, 2011 2:25 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

त्र्यंबकेश्वरमधल्या सीताराम बाबा या साधूला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे 2 लाख रूपयांच्या बनावट नोटा आणि 6 लाख रूपयांच्या जमिनीत पुरलेल्या खर्‍या नोटा, गावठी पिस्तुल, काडतूस असा माल जप्त करण्यात आला. बनावट नोटा छापण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. महसूल आणि त्र्यंबक पोलिसांनी त्याच्या आश्रमावर छापा टाकून हा गुन्हा उघडकीस आणला. बनावट नोटा छापण्यासाठी त्याने अत्याधुनिक स्कॅनरची ऑर्डर दिल्याची पावतीही मिळाली आहे.

close