बेस्ट फाईव्ह फॉर्मुल्यावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली

February 2, 2011 3:16 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

अकरावी प्रवेशासंदर्भात राज्य सरकारने ठरविलेल्या बेस्ट फाईव्ह फॉर्मुल्यावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी दोन ते तीन दिवस लांबणीवर गेली आहे. बेस्ट फाईव्ह फॉर्मुल्यावर आयसीएसईच्या याचिकेवर अंतरीम निकाल देताना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी बेस्ट फाईव्ह फॉर्मुला मान्य केला होता. तसेच आयसीएसई बोर्डांना आणि विद्यार्थ्यांनाही हा फॅार्मुला लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुंबई हायकोर्टानं फॉर्मुला रद्द ठरवला होता. त्याला राज्य सरकाराने सुप्रीमकोर्टात आव्हान दिलं. या केसमध्ये आयसीएसई बोर्डाचे पालक विद्यार्थी असे मिळून 40 हून अधिक प्रतिवादी आहेत. या केस संदर्भातल्या सर्व प्रतिवादींनी स्वत:चं म्हणणं मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागून घेतली होती. राज्य सरकारने या संदर्भाततलं आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टाकडे सादर केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता काय निकाल देतं याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. यंदा सुरु होणार्‍या शैक्षणिक वर्षासाठी हा उत्सुकतेचा विषय आहे.

close