सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी-भुजबळ

February 2, 2011 3:31 PM0 commentsViews: 22

02 फेब्रुवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी ही मागणी लावून धरली. याप्रकरणात काही व्यक्तींकडून हेतूपुरस्सर आपल्यावर आरोप होताहेत. पोपट शिंदेचा गॉडफादर कोण ? हे लोकांसमोर आलंच पाहिजे यासाठी सीबीआयलाच ही चौकशी करु द्या अशी मागणीही भुजबळांनी केली. दरम्यान याप्रकरणाचा तपास सीबीआयने तातडीनं सुरु करावा यासाठीच्या कायदेशीर बाबी बुधवारी सकाळपासूनच गृहमंत्रालयाकडून हालचाली व्हायला सुरुवात झाली अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.. यामुळे या सगळ्या प्रकाराचा तपास आता सीबीआय करेल अशी माहिती शक्यता निर्माण झाली आहे.

close