जात लपवण्यामुळे समाजात अराजकतेचं वातावरण वाढलं – नेमाडे

February 2, 2011 4:53 PM0 commentsViews: 13

02 फेब्रुवारी

जाती लपवण्याच्या वृत्तीमुळे समाजात अराजकतेचं वातावरण वाढलं आहे असं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं. संपूर्ण साने गुरुजी या पुस्तकाच्या 46 व्या खंडाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. नेमाडे म्हणाले की, आयुष्य आणि साहित्य यातलं अंतर वाढत असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. बुकर, साहित्य अकादमी सारखे पुरस्कार मिळाले म्हणजे ते श्रेष्ठ लेखन मानायचं हा चुकीचा निकष असल्याचं नेमाडे म्हणाले.

close