बेस्टच्या 1 हजार 561 सीएनजी बसेस दुरुस्तीसाठी जाणार

February 2, 2011 5:17 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

मुंबईत बेस्टच्या 1 हजार 561 सीएनजी बसेस दुरुस्त करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यात अंधेरीमध्ये एका सीएनजी बसला आग लागली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे बेस्टनं नवीनच घेतलेल्या अशोक लेलँड कंपनीकडून एक हजार बसेस विकत घेतल्या होत्या. या एक हजार बसेसपैकी 800 सीनजी बसेस तसेच बेस्टकडे असलेल्या आधीच्या 761 सीएनजी बसेस अशा एकूण 1 हजार 561 सीएनजी बसेसची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे दुरुस्तीचं काम मुंबईतल्या दहा बस डेपोमध्ये होणार आहे. या सर्व बसेसची दुरुस्ती पूर्ण व्हायला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशोक लेलँडच्या 800 सीएनजी बसेसच्या दुरुस्तीचा खर्च त्याच कंपनीकडून वसूल करणार असल्याचं बेस्टनं सांगितलं आहे.

close