नजर ओबामांच्या राजकीय प्रवासावर

November 4, 2008 11:20 AM0 commentsViews: 3

4 नोव्हेंबर, अमेरिकाअमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकोत अथवा नाही, ओबामा यांनी अध्यक्षपदाचं तिकीट मिळवून इतिहास निर्माण केला आहे. अमेरिकेसारख्या देशात ओबामा यांचा हा प्रवास आश्चर्यकारक आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासावर एक नजर.ते शेवतवर्णीय नाहीत. त्यांचे वडिलसुद्धा अमेरिकन नव्हते. चार वर्षांपूर्वी ते सिनेटरही नव्हते. ओबामांचं बालपण मागासलेल्या भागात गेलं. अशी पार्श्वभूमी असताना ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत धडक मारतील, यावर कुणाचा विश्वास बसणं कठीण होतं. पण, त्यांनी जेव्हा प्रचार मोहिम सुरू केली. त्यावेळी ते लोकप्रिय ठरले. त्यांच्या घणघणाती भाषणांनी आणि ठोस मुद्यांमुळे अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले.हवाईमध्ये 1961 साली ओबामा यांचा जन्म झाला. त्यांची आई अमेरिकन तर वडील केनियन. ओबामा दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडलांनी डिव्होर्स घेतला. त्यानंतर वडील केनियाला परतले. आईनं पुन्हा लग्न केलं. ओबामांनी आपल्या वडिलांना फक्त एकदाच पाहिलं. त्यावेळी ते 21 वर्षांचे होते. श्वेतवर्णीय आजी-आजोबांनी त्यांचं पालनपोषण केलं. 1985 मध्ये कोलंबीया विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर ते सार्वजनिक कार्यात उतरले. शिकागोमधल्या कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी त्यांनी कार्य केलं. ओबामा यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. पण, त्यांची खर्‍या अर्थानं दखल घेतली गेली 2004 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात. ' अमेरिका लिबरल किंवा कन्झर्व्हेटिव्ह नाही. ती फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे ' ही त्यांची घोषणा लोकप्रिय झाली.वयाच्या 44 वर्षी ते तिसरे आफ्रिकन-अमेरिकन सिनेटर बनले. आशा आणि परिवर्तनाचा नारा देत त्यांनी तरुण मतदारांना आकर्षित केलं. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या परिवर्तनाच्या भाषणानंतर 45 वर्षांनी ओबामांच्या रुपानं अमेरिकेत बदलाची नांदी झाली आहे.

close