देशमुखांच्या घरात 23 लाखाची रोकड जप्त

February 2, 2011 6:17 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी सीबीआयनं आज आदर्शचे चीफ प्रमोटर्स आर. सी. ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम एम वांछू आणि प्रशासकीय अधिकारी पी. व्ही देशमुख यांना नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोटिशीत करण्यात आली आहे. सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यापासून यापैकी अजूनपर्यंत कोणीही सीबीआयसमोर आलेलं नाही. दरम्यान सीबीआयनं आज पी. व्ही. देशमुख यांच्या घरात छापा टाकला. त्यात त्यांना 23 लाख रुपयांची रोकड मिळाली. देशमुख यांच्या घराची झडती सीबीआयने आज घेतली.

close