आरोपीची हत्या करुन पोलीस काँस्टेबलची आत्महत्या

February 3, 2011 9:12 AM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथं पोलीस काँस्टेबलनं एका कैद्याची हत्या केली. या कैद्याची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मरण पावलेल्या आरोपीवर 360 अंतर्गत गुन्हा दाखल होता. या कैद्याचं नाव संदीप घोरभांडे असं आहे. तर काँस्टेबलचं नाव पंडित मारवाडे आहे. पंडित मारवाडे यांनी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत त्या दोघांची आधी ओळख असल्याचे स्पष्ट होते. मात्र घटना नेमक्या कुठल्या कारणांमुळे घडली याबद्दल पोलीस काहीही स्पष्टपणे बोलत नाही. तर काँस्टेबलच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप केला.

close