कांद्याची घट रद्द करण्याचा मुद्दा पेटला ; शेतकर्‍यांचं रास्ता रोको

February 3, 2011 9:22 AM0 commentsViews: 5

03 फेब्रुवारी

नाशिकात कांदा व्यापार्‍यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्यानं कांद्याचे लिलाव बंद ठप्प आहेत. याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहेत. याच्या निषेधार्थ नाशकात आज कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. लासलगाव आणि मनमाडमध्ये शेतकर्‍यांनी निदर्शने केली आहेत.मनमाडमध्ये बाजार समितीवर मोर्चा काढून शेतकर्‍यांनी घटनेचा निषेध केला. उमराणे झोडगे इथंही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मुंबई-आग्रा हायवे ठप्प झाला आहे. कांद्याच्या क्विंटल मागे दोन किलोची घट रद्द करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद सुरु आहे.

close