अशोक चव्हाणांची मोर्चेबांधणी

February 3, 2011 9:41 AM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी सीबीआयच्या एफ.आय.आर.मध्ये नाव आल्यानं अडचणीत सापडलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली. आपल्या समर्थक 24 आमदारांची अशोक चव्हाण यांनी बैठक घेऊन चर्चा केली. अशोक चव्हाण समर्थक माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतल्या घरी ही बैठक झाली. तर सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टी होती त्यात सर्व आमदार आले होते वेगळी अशी बैठक झाली नाही असं यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं. दरम्यान या बैठकीनंतर चव्हाणांच्या समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजून आदर्शच्या जमिनीची मालकी कुणाची हे ठरलेलं नाही असं असताना अशोक चव्हाण यांचं नाव सीबीआय कुठल्या आधारावर आरोपी म्हणून नोंदवू शकतं ? असा सवालही चव्हाण समर्थक आमदारांनी उपस्थित केला. एकीकडे याचा तपास एक आयोग करतं आहे. अशा वेळी या गुन्हा दाखल झाल्यामुळे आयोगाच्या तपासावर परिणाम होऊ शकतो अशा भावनाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांकडे व्यक्त केल्या आहेत.

close