डीएमके अजूनही ए.राजा यांच्या पाठिशी

February 3, 2011 9:52 AM0 commentsViews:

03 फेब्रुवारी

माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी द्रमुक पक्षाच्या प्रचार विभाग सचिवपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. राजा यांना टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी काल अटक करण्यात आली. त्यांना पतियाळा कोर्टात हजर करण्यात आलं आहे. चौकशीसाठी सीबीआय राजा यांच्या एक आठवड्याची रिमांड मागण्याची शक्यता आहे. दरम्यान राजांच्या पाठीशी भक्कमपणे उभ राहण्याचा निर्णय द्रमुकनं घेतला आहे. राजा यांना अटक झाली. पण ते दोषी असल्याचे सिध्द झाले नाहीत असं पक्षाने म्हंटलं आहेत. तर ए.राजा यांना अटक झाली असली तरी आपण जेपीसीच्या मागणीवर ठाम आहोत असं भाजपचे नेते राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

close