आता वानखेडे स्टेडियमची परिक्षा !

February 3, 2011 10:44 AM0 commentsViews: 6

03 फेब्रुवारी

कोलकात्याच्या इडन गार्डनवरची मॅच हटवल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. वानखेडे स्टेडियमवर 2 एप्रिलला स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. पण त्याआधी दोन लीग मॅचेसही या मैदानावर होणार आहे. गेल्याच आठवड्यात आयसीसीने वानखेडे स्टेडियमची पाहणी केली होती आणि स्टेडियमच्या कामावर समाधान व्यक्त केलं होतं. वानखेडे स्टेडियम मीडियासाठी अजून खुलं झालेलं नाही. स्टेडियमची बाहेरची बाजू जी आयसीसीसाठी चिंतेची बाब बनली आहे. बाहेरच्या बाजूचं काम अजूनही सुरू आहे आणि खाली ढिगारा तसाच पडून आहे. आयसीसीचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चीफ शरद पवार 7 फेब्रुवारीला मैदानाची पहाणी करणार आहेत.

close