चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमची भिंत कोसळून दोन जण जखमी

February 3, 2011 10:46 AM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

दुसरीकडे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमबाबतही चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सकाळी चेपॉक स्टेडियमची एक भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तिकिट विक्री याठिकाणी सुरू असताना हा अपघात घडला. जवळजवळ 500च्या वर लोकांनी तिकिटासाठी गर्दी केली होती. या अपघातात 23 वर्षीय पुरूष आणि 30 वर्षीय महिला जखमी झाले आहे. चेन्नईत वर्ल्ड कपच्या एकूण चार मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. त्यात 20 मार्चला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली मॅच होणार आहे.

close