औषधनिर्माताच बनला डॉक्टर !

February 3, 2011 11:00 AM0 commentsViews: 5

03 फेब्रुवारी

औषधनिर्माताच डॉक्टरचं काम करीतअसल्याचा धक्कादायक प्रकार शहापूर तालुक्यात उघडकीस आला. टाकीपठार परिसरातल्या 40 गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आलं. पण त्याची दुरवस्था अजूनही सुरु आहे. काल या आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विक्रम कसबे या फार्मसिस्टनं 25 ते 30 रुग्णांना तपासून गोळ्या व इंजेक्शन दिले. आरोग्य केंद्राचे एक वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.जे. पवार रजेवर आहेत. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी कसबेला रुग्णांना तपासण्यास सांगितल्याचं स्पष्ट झालं आहे. पण या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

close