पुण्यात अवैध बांधकामाचे प्रकरण राष्ट्रवादीला भोवण्याची शक्यता

February 3, 2011 11:12 AM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

पिंपरी चिंचवडमधील अवैध बांधकामाचे प्रकरण राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भोवण्याची चिन्ह आहेत. महानगरपालिकेत असलेल्या 25 पैकी 15 नगरसेवकांना अपात्र का ठरविण्यात येऊ नये अशी नोटिस या नगरसेवकांना देण्यात आली. मात्र अवैध बांधकाम केलं नाही असं या नगरसेवकांचं म्हणणं आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी मनपा आयुक्तांना कोर्टात जाण्याची परवानगी दिली. माहितीच्या अधिकारात या नगरसेवकांनी अवैध बांधकाम केल्याचे स्पष्ट झालं होतं.

close