पोलीस निरीक्षकाने घरात घूसून अत्याचार केल्याचा आरोप !

February 3, 2011 11:15 AM0 commentsViews: 3

03 फेब्रुवारी

नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मध्यरात्री घरात घूसून अत्याचार केल्याचा आरोप काही आदिवासी महिलांनी केला. चव्हाण यांना बडतर्फ करा अशी मागणी करत या महिलांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. जुन्नरच्या बोरी ठाकरवाडीत सोमवारी 31 जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असा दावा या महिलांनी केला. मुख्यमंत्र्यांना याबाबतचं निवदेन पाठवण्यात आलं आहेत. निरीक्षक चव्हाण यांना आठ दिवसांत बडतर्फ केलं नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा आदिवासी महिलांनी दिला. दरम्यान आयबीएन लोकमतनं पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

close