विनाशकारी वादळ ‘यासी’ ऑस्ट्रेलियन किनारपट्टीला धडकले

February 3, 2011 11:27 AM0 commentsViews: 9

03 फेब्रुवारी

1918 नंतरचं सर्वात विनाशकारी वादळ यासी ऑस्ट्रेलियन किनारपट्टीला धडकले आहे. कॅटगरी फाईव्हमध्ये या वादळाची नोंद करण्यात येते. या वादळामुळे क्वीन्सलंडच्या किनार्‍यावर ताशी 285 किमीच्या वेगाने वारे वाहत आहे. यामुळे इथल्या घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या वादळाच्या तडाख्यामुळे क्वीन्सलंड मधले कार्डवेल टाऊन संपूर्ण उद्‌ध्वस्त झाले. तर स्थानिकांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने आता 4000 सैनिक तैनात केले आहेत. ट्रॉपिकल सायक्नोन किंवा ज्याला हरीकेन किंवा टायफूनही म्हटलं जातं ते सुरू होतं कमी दाबाच्या पट्‌ट्यातून हळुहळू याचा भोवरा वाढत जातो आणि या वादळाचा वेग ताशी 118 किलोमीटर्स किंवा त्याचा वर पोचला की मग या वादळाची नोंद 'सिव्हियर' म्हणजे विनाशकारी म्हणून केली जाते. 1918 नंतर आलेलं हे सर्वात मोठं वाद आहे.

close