‘मी नथुराम’च्या प्रयोगाला राष्ट्रवादीचा विरोध

February 3, 2011 11:36 AM0 commentsViews: 8

03 फेब्रुवारी

मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या ठाण्यातील प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला. ग़डकरी रंगायतन बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परिसरात जवळपास 350 पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. काल आयोजकांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानूसार त्यांना सुरक्षा देण्यात आली. तर सध्या गडकरी मध्ये या नाटकाचा प्रयोग सुरु आहे.पण प्रयोगादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी जिया शेख या काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला ताब्यात घेण्यात आलं आहे.. या नाटकाचे आजपर्यंत 600 प्रयोग झाले आहेत.

close