ए राजा यांच्यासह दोघांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

February 3, 2011 11:44 AM0 commentsViews: 2

03 फेब्रुवारी

माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना आज दिल्लीतल्या पतियाळा कोर्टानं पाच दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. त्यांच्यासह त्यांचे खासगी सचिव आर के चंडोलिया आणि माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरिया यांनाही पाच दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी बुधवारी या तिघांना सीबीआयनं अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या तिघांनीही सरकारचं 22 हजार कोटींचं नुकसान केलं आहे. त्यामुळे या तिघांचीही एकत्रित चौकशी होणं महत्वाचं आहे असा दावा सीबीआयनं केला. स्वान आणि युनिटेक या दोन्ही कंपन्यांना झुकतं माप देण्यात आलं. आणि या कंपन्यांनी शेअर्सची विक्री करुन मोठा फायदा मिळवला असंही सीबीआयनं कोर्टात सांगितलं. पण सीबीआयने सादर केलेली नुकसानीची सर्व आकडेवारी ही काल्पनिक आहे असा दावा राजा यांच्या वकिलांनी केला. दरम्यान राजांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय द्रमुकनं घेतला आहे. राजा यांना अटक झाली. पण याचा अर्थ ते दोषी आहेत असा होत नसल्याचं द्रमुकनं म्हटलं आहे.

close