वाळूमाफियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण गावकर्‍यांचा आरोप !

February 3, 2011 11:57 AM0 commentsViews:

03 फेब्रुवारी

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या कोतवली गावाजवळच्या दाभोळ खाडीतून शेकडो ब्रास वाळूचाअनधिकृत उपसा होत आहे. हा प्रकार गावकर्‍यांनीच पोलिसांच्या लक्षात आणून दिला. पण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळीच पंचनामा केला असला तरीही संबंधितांवर अद्यापही गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे खाडीतील वाळू भरलेला बार्ज आणि वाळूचोर पळून गेले आहे. पोलिसांनी फक्त एक वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त केला.गेला महिनाभर सुरू असलेला हा प्रकार महसूल अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वाळूमाफ़ियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण मिळतय असा आरोप गावकर्‍यांनी केला.

close