दूध खरेदी – विक्री दरात वाढ

February 3, 2011 12:43 PM0 commentsViews: 6

03 फेब्रुवारी

पेट्रोल, कांद्याच्या भाववाढीने हैरान झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे.आता दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दूध खरेदी आणि विक्री दरात ही वाढ करण्यात आली आहेत. गाईच्या दुधासाठी अडीच रुपये जास्त मोजावे लागतील आणि म्हशीच्या दुधात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी ही माहिती दिली. 16 फेब्रुवारी पासून ही दरवाढ लागू होणार आहे.

close