रास्ता रोको करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीचार्ज

February 3, 2011 3:24 PM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या मुंगसे बाजार समितीत पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. बाजार सुरू होताच व्यापार्‍यांनी दीड ते 3 रुपये किलो एवढ्या कमी भावानं लिलाव सुरू केला होता. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आग्रा रोडवर रास्ता रोको केला. दोन तास रस्ता बंद राहिल्याने पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज सुरू केला. यावेळी तरुण शेतकरी पळून जाऊन शकले मात्र पोलिसांनी वृद्ध शेतकर्‍यांवर लाठ्या चालवल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पिस्तुलचाही धाक शेतकर्‍यांना दाखवला. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात चंद्रकांत कांबळे हे पोलिस अधिकारी जखमी झाले.

close