एसआरए प्रकल्पाविरोधात आमरण उपोषण

February 3, 2011 5:06 PM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या गोळीबार – बाजारच्या रहिवाश्यांनी एसआरए प्रकल्पाविरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे. कोणत्याही प्रकारचा लेखी करार किंवा पूर्वकल्पना न देता बिल्डर जबरदस्तीनं लोकांची घरं रिकामी करत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. दडपशाही करुन घरं सोडून जाण्यासाठीही भाग पाडलं जातं आहे असा आरोप केला जातोय्. स्थानिकांचा विरोध जुगारून बिल्डर हा प्रकल्प राबवत असल्यामुळे स्थानिक रहिवाशी नाराज आहेत. एसआरएचे अधिकारीही बिल्डरलाच मदत करत आहे खर्‍या विकासाऐवजी बिल्डर आणि अधिकार्‍यांचाच विकास या प्रकल्पात होतोय असं मतं सामाजिक कार्यकर्ते मांडत आहेत.

close