आदर्श घोटाळ्याप्रकरणी संबंधितांची दिवसभर सीबीआय चौकशी

February 3, 2011 5:16 PM0 commentsViews: 2

03 फेब्रुवारी

आदर्श घोटाळ्याप्रकरणी सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, एम.एम.वांच्छू, आणि आर. सी. ठाकूर यांची सीबीआयनं आज दिवसभर चौकशी केली. तब्बल दहा तास सीबीआयच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये ही चौकशी झाली. उद्या पुन्हा या तिघांची चौकशी होणार आहे. ब्रिगेडियर दीपक सक्सेना आणि इतर दोघांना आज साक्षीदार म्हणून सीबीआयनं बोलावलं होतं. याचप्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयनं धाडीही टाकल्या होत्या. त्यानंतर आता चौकशीलाही सुरुवात झाली.

close