नाशिकमध्ये तरुणाच्या हत्येनंतर तोडफोड

February 4, 2011 9:11 AM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारीनाशिक रोड परिसरात दोन गटातल्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. त्यामुळे देवळाली परिसरात तणाव निर्माण झाला. संदीप भालेराव असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. रोकडोबा वाडीत विनायक राव यानं संदीपवर वार केल्यानं त्याचा मृत्यू झाला. आरोपीला अटक केल्याशिवाय संदीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली. दरम्यान या घटनेनंतर नाशिकरोड देवळाली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दुकानांची आणि 25 ते 30 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाने दगडफेक केली तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. संदीपला यापूर्वीही धमक्या आल्याचं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे. तर नाशिकरोड परिसरात मध्ये सध्या वाढलेल्या बेकायदा धंद्यांमुळे हे घडल्याचंही बोललं जातं आहे.

close