नाशिकमध्ये कांदे कपातीचा वाद चिघळला

February 4, 2011 9:16 AM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारी

कांदे कपातीचा वाद चिघळतच चालला आहे. मालेगाव मुंगसे भागात कपातीला व्यापार्‍यांचा विरोध आहे, त्यासाठी व्यापार्‍यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व लिलावांवर बहिष्कार टाकला. काल मुंगसे बाजार समितीमध्ये व्यापार्‍यांनी दीड रुपये किलो एवढ्या कमी किंमतीने कांद्याची घाऊक खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. काल दुपारी झालेल्या या लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात येतोय. या लाठीचार्जमध्ये वृृद्ध शेतकर्‍यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती.याप्रकरणी आर. आर. पाटील यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली. मुंगसे परिसरातल्या सर्व गावांमध्ये पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज बंद पाळण्यात येत आहे.

close