इजिप्तसाठी आज निर्णायक शुक्रवार

February 4, 2011 10:51 AM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारी

इजिप्तमधल्या अराजकतेचा आज 11 वा आणि निर्णायक दिवस आहे. इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांना पद सोडण्यासाठी विरोधकांनी दिलेली मुदत आज संपत आहे. आज निदर्शक राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत. काल तहरीर चौकात हजारो निदर्शकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. इजिप्शियन सरकारनं काल मीडियाचा एकही कॅमेरा तहरीर चौकामध्ये येऊ दिलेला नाही. तसेच अनेक मीडिया प्रतिनिधींनाही अटक करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघानं आतापर्यंत 600 कुटुंबांची सुटका केल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं. तर दुसरीकडे या अराजकतेला इजिप्तमधला मुस्लिम ब्रदरहूड जबाबदार असल्याचा आरोप मुबारक यांनी केला.

close