औरंगाबादमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक

February 4, 2011 10:52 AM0 commentsViews: 7

04 फेब्रुवारी

काँग्रेस सरकारच्या सरकारच्या काळातील गैरव्यवहार आणि महागाईच्या मुद्यावर भाजपनं औरंगाबाद इथं राज्य कार्यकारीणीची बैठक आयोजित केली आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात काँग्रेसच्या गैरव्यवहाराचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. काँग्रेसविरुद्ध आगामी काळात रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे. सध्या राज्यात माफिया राज सुरु आहे त्याविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

close