आदर्श प्रकरणी सीबीआयची आज पुन्हा चौकशी

February 4, 2011 10:55 AM0 commentsViews: 2

04 फेब्रुवारी

आदर्श घोटाळा प्रकरणी सीबीआयनं आज पुन्हा चौकशी सुरु केली. क न्हैय्यालाल गिडवानी, एम.एम. वांच्छू आणि आर.सी. ठाकूर यांची चौकशी सुरू आहे. आदर्श घोटाळ्याप्रकरणी या तिघांचीही सीबीआयनं काल दिवसभर चौकशी केली. तब्बल दहा तास सीबीआयच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये ही चौकशी झाली. आज पुन्हा या तिघांची चौकशी होणार आहे. ब्रिगेडिअर दीपक सक्सेना आणि इतर दोघांना काल साक्षीदार म्हणून सीबीआयनं बोलावलं होतं. याचप्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयनं धाडीही टाकल्या होत्या.

close