उद्देश योग्य पण कृती अयोग्य – प्रा. राम शेवाळकर

November 4, 2008 11:46 AM0 commentsViews: 19

4 नोव्हेंबर, मुंबईमराठी – बिहारी वादाचा फटका फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागालाही बसलाय. पण सामान्य माणूस यामुळे स्वत:ला असुरक्षित समजतोय. मग तो मराठी असो किंवा बिहारी. राज ठाकरेंच्या परप्रांतीयाविरोधातील आंदोलनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलनावर प्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकर म्हणाले की, उद्देश योग्य आहे पण कृती अयोग्य आहे. उद्देश योग्य यासाठी की महाराष्ट्रात मराठीची प्रतिष्ठा राखली पाहिजे. महाराष्ट्रात रेल्वेची परीक्षा होतात.पण भरती इतर राज्यातील उमेदवारांची होते.त्या राज्याच्या नेत्यांचा निषेध व्हायला पाहिजे. पोटार्थी आणि निष्पाप मुलांना मारायला नको होतं.