देव आनंद यांचा ‘हम दोनो’ सिनेमा पाहा रंगीत

February 4, 2011 12:19 PM0 commentsViews: 2

04 फेब्रवारी

देव आनंदच्या अभिनयानं आणि सुंदर गाण्यांनी नटलेला ब्लॅक ऍण्ड व्हाईट 'हम दोनो' हा सिनेमा आता सगळ्यांना पुन्हा एकदा बघता येणार आहे आणि तो ही कलरफुल. देव आनंद आणि बॉलिवुड बडिज्‌च्या उपस्थितीत नुकतचं मुंबईत या रंगीने हम दोनोचा रंगीत प्रिमिअर सोहळा पार पडला.

1961 सालचा हम दोनो हा सिनेमा 2011 साली रंगीत होऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मुंबईमध्ये या रंगीत हम दोनोचा प्रिमिअर सोहळा पार पडला. अर्थातच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या एव्हरग्रीन ऍक्टर देव आनंद यांनी. या ग्रॅन्ड प्रिमिअर सोहळ्यासाठी बॉलिवुडमधली अनेक दिग्गज कलाकार हजर होते त्याच बरोबर काही राजकीय नेतेमंडळी सुध्दा आवर्जून उपस्थित होती. ही मंडळी खास देवसाहेबसाठी आवर्जून उपस्थित होती. सहा दशकाहून अधिक काळ बॉलिवुड वर राज्य करणार्‍या सदाबहार अभिनेते देवानंद यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे.

close