सौरव गांगुलीची आयपीलची इनिंग संपली

February 4, 2011 12:46 PM0 commentsViews: 6

04 फेब्रुवारी

सौरव गांगुली आयपीएलमध्ये खेळणार नाही असा निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलने घेतला आहे. आयपीएल 4 च्या लिलावात गांगुलीला कोणीही विकत घेतलं नव्हतं. पण तरीही त्याला आयपीएलमध्ये घ्यावं याबद्दल प्रयत्न सुरु होते. लिलावानंतर कोची टीमनं गांगुलीला टीममध्ये घेण्यास पसंती दाखवली होती आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी आज आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत इतर फ्रँचायझीनं या निवडीवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे कोची टीम सौरव गांगुलीला आता विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे सौरव गांगुलीसाठी आयपीएल चारचे दरवाजे बंद झाल्यात जमा आहेत.

close