सेन्सेक्समध्ये 441 अंशांची घसरण

February 4, 2011 1:01 PM0 commentsViews: 5

ऋतुजा मोरे, मुंबई

04 फेब्रुवारी

गुरुवारच्या तेजीनंतर आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स गडगडला. मार्केट बंद होण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासांत 450 अंशांनी खाली कोसळला. सेन्सेक्स 18008.15 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्येही आज 131 अंशांची घट झाली. निफ्टी 5395.75 अंशांवर बंद झाला. आज रिअल्टी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त नफावसूली करण्यात आली. करुणानिधींच्या टीव्ही चॅनलला 200 कोटी देण्याच्या घोषणेनंतर डीबी रिअल्टी शेअर्स सगळ्यात जास्त म्हणजे 8 टक्के खाली घसरला. रिअल्टीशिवाय एफएमसीजी, आयटी आणि ऑईल ऍन्ड गॅस सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

close