छटपूजेच्या होर्डिंग हटवण्यावरून मुंबईत तणाव

November 4, 2008 11:57 AM0 commentsViews: 4

4 नोव्हेंबर, मुंबई छटपूजेनिमित्त मुंबईतील जुहू चौपाटीवर राजकीय होर्डिंग लावण्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि महापालिका कर्मचार्‍यांमध्ये वाद झाला आहे. छटपूजेनिमित्त जुहू परिसरात होर्डिंग लावण्यात आले होते.होर्डिंग लावण्याची परवानगी महापालिकेनं दिली होती, असं संजय निरुपम यांनी सांगितलं. दरम्यान, पालिका कर्मचार्‍यांनी सकाळी होर्डिंग हटवण्याच्या कामाला सुरूवात केली. त्यामुळे संजय निरुपम आणि पालिका कर्मचार्‍यांत बाचाबाची झाली. या वादात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हायकोर्टानं होर्डिंग न लावण्यासंबंधी असे काही आदेश दिलेले नाहीत. छटपूजेमुळे पालिकेकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप संजय निरूपम यांनी यावेळी केला.

close