लातूरमध्ये इंजिन आईलचे 53 बॅरल जप्त

February 4, 2011 4:10 PM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

लातूर जिल्हातील निलंगा येथे पोलिसांनी धाड टाकून भेसळ युक्त इंजिन आईलचे 53 बॅरल जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी जप्त केलेल्या या ऑईलची किंमत 9 लाख 22 हजार रुपये आहे. या संदार्भात एकाला अटक करण्यात आली. निलंगा येथील शिवाजी नगर परिसरात इंधनमध्ये भेसळ होत असल्याच्या माहितीवरुन पोलिसानी धाड टाकली असता भेसळयुक्त इंधन ऑईल, भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पोलिसांना सापडले आहेत. या संदर्भात हजीरसाब कुरेशी याला अटक करण्यात आली. तेल माफियांवर राज्यभर छापे सत्र सुरु असताना लातूर जिल्हातील मात्र आज ही पहिलीच कारवाई आहे.

close