ए राजा यांची सहकार्‍यांसह संयुक्त चौकशी

February 4, 2011 5:23 PM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

टू जी स्पेटक्ट्रम घोटाळ्यात कालपासून सीबीआय कोठडीत असलेले माजी दूरसंचार मंत्री ए राजा आज कसून चौकशी करण्यात आली. पण राजा यांनी मौन बाळगणं पसंत केलं. राजांसोबतच त्यांचे खाजगी सचिव आर के चंडोलिया आणि माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांचीसुद्धा चौकशी झाली. या तिघांमुळे सरकारी तिजोरीला 32 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असा सीबीआयचा दावा आहे. राजांच्या वतीने ही रक्कम मॉरिशियस, मादागस्कर, युएई आणि सायप्रस या देशांमध्ये गुंतवण्यात आली असं सीबीआयचे म्हणणं आहे. पण राजा फारसं बोलत नसल्यामुळे तपास करणं सीबीआयला कठीण जातं आहे.

close