काळा पैसा दडवलेल्यांची यादी उघड

February 4, 2011 5:35 PM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

जर्मनीतजवळच्या एलजीटी बँक ऑफ लिस्टेन्स्टाईनमध्ये काळा पैसा गोळा करणार्‍या 26 खातेधारकांची यादी 2009 साली भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या ताशेर्‍यांनंतरही गोपनीयतेच्या नावाखाली ही यादी जाहीर केली गेली नव्हती. या 26 जणांपैकी 15 नावं आम्हाला कळली आहेत. ही पंधरा जणांची यादी आहे. त्यात मार्निची ट्रस्टचे गांधी कुटुंबीय, अंब्रुनोवा ट्रस्टचे धुपेलिया कुटुंबीय आणि सोकालो स्टिफटंगचे मेहता कुटुंबीयांचा समावेश आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 3 कुटुंबांतल्या 15 जणांनी मिळून दडवलेली रक्कम केवळ 52 कोटी रुपये आहे.

close