भाई जगताप यांच्यावर हल्ला

February 4, 2011 5:55 PM0 commentsViews: 13

04 फेब्रुवारी

काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला झाला. बनारसजवळ चंदोलीमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेदरम्यान हा हल्ला झाला. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने सभा सुरु असतांना हवेत गोळीबार केला. यानंतर झालेल्या धक्काबुक्कीत भाई जगताप जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाई जगताप यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर माझी तब्बेत स्थिर आहे काळजी करण्यासारखं काही नाही असं खुद्द भाई जगताप यांनी सांगितलं आहे. जगताप यांच्यावर तुलसी सिंग राजपुत या कार्यकर्ताने हा हल्ला केला. तुलसी सिंग राजपुत यांचा भाई जगताप यांच्या सोबत विधानसभा तिकिटावरुन वाद झाला आणि त्यांच्या समर्थकाने भाई जगताप उपस्थित असलेल्या सभेत हवेत गोळीबार केला. भाई जगताप उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे निरीक्षक आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपाबद्दल ही बैठक होती. दरम्यान तुलसी सिंग राजपुत या कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे.

close