‘पत्रकार मंत्र्यांनी’ सोयीची पत्रकारिता थांबवावी – आर. आर. पाटील

February 5, 2011 5:02 PM0 commentsViews: 1

05 फेब्रुवारी

ऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी आपली सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहमती होती. त्यामुळे काही मंत्र्यांनी आता सोयीची पत्रकारिता बंद करावी, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी हा अप्रत्यक्ष टोला लगावला. मंत्र्यांनी सोयीची पत्रकारीता बंद करावी किंवा मंत्रिमंडळाची बैठक पत्रकारांना खुली करावी असंही आर.आर.पाटील म्हणाले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगलीत पत्रकारांना सांगितलं. तसेच कितीही धाडी टाकल्या तरी भ्रष्टाचार काही कमी होणार नाही अशी कबुलीच गृहमंत्र्यांनी दिली. चोर्‍या करणारेच सावध होतात आणि लाभार्थी वंचितच राहतायत अशी हतबलताही आबांनी व्यक्त केली.

close