कायदेशीर कामासाठी सरकारी दरवाजे खुले – मुख्यमंत्री

February 5, 2011 9:46 AM0 commentsViews: 3

05 फेब्रुवारी

कायदेशीर काम करणार्‍या सर्व व्यवसायिकांचं आमच्याकडे स्वागतच होईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. बिल्डर्ससाठी मुख्यमंत्र्यांचे दरवाजे बंद असल्याची बातमी गेले काही दिवस चर्चेत होती. त्याचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केल आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या पदाधिकांर्‍यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी काल बोलावली होती. त्यामध्ये मुंबईतल्या बिल्डर्सच्या शंकाच समाधान करताना मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंख्यमंत्री झाल्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत राजकारणी, सरकारीबाबू आणि बिल्डरांची भ्रष्टयुती कार्यरत आहे असं वक्तव्य वारंवार केलं होतं. त्यामुळे बिल्डर लॉबी दुखावली गेल्याचं चित्र उभं राहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री सचिवालयाचे दरवाजे कायदेशीर काम करणार्‍या बिल्डरांसह कोणत्याही उद्योजकांसाठी उघडे आहेत असं जाहीर केलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बांधकाम व्यावसायिकांनी योग्य प्रमाणात नफा कमवायला कुणाचीही हरकत नाही पण नियमांचे उल्लंघन करून आणि संगनमताने कायद्यातून पळवाट काढून अव्वाच्या सव्वा नफा कमावणे योग्य होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. या बैठकीत बांधकाम व्यावसायिक हा राज्याच्या आणि मुंबईच्या विकासातील महत्वपूर्ण घटक आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करुन सर्वाना परवडणारी घरं उपलब्ध करुन देणं आवश्यक आहे अशी नेमकी बाब मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितली. बांधकाम आणि विकासक क्षेत्राला अडचणीची ठरणारी किचकट प्रक्रिया सुलभ होण्यासाठी गृहनिर्माण धोरण तपासून पाहण्याचीही आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close