बँका व्याजदर कमी करणार

November 4, 2008 11:51 AM0 commentsViews: 4

04 नोव्हेंबर दिल्ली,पंतप्रधानांच्या उद्योगपतींसोबत झालेल्या बैठकीनंतर लगेचच बँकांनी उद्योगक्षेत्रासाठी सकारात्मक पावलं उचलली आहेत. पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँके नंतर आता युको बँकेनंही व्याजदरात घट करण्याची घोषणा केलीय. युको बँकेनं कर्जावरील व्याज चौदा टक्कयांवरून साडेतेरा टक्के केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियादेखील पुढील आठवड्यात व्याजदर कमी करेल अशी शक्यता आहे. बँक ऑफ इंडियाही त्यांचे व्याजदर येत्या तीन-चार दिवसात अर्ध्या टक्क्यानं कमी करण्याची शक्यता आहे. या बँकाच्या पाठोपाठ देशातल्या काही प्रमुख बँकाकडूनही अशाच घोषणांची अपेक्षा केली जातं आहे .

close