काळा पैसा ठेवणार्‍यांची यादी सरकार का लपवत आहे – गडकरी

February 5, 2011 10:20 AM0 commentsViews: 2

05 फेब्रुवारी

स्वीस बैंकेत कोट्यवधी रूपये ठेवणार्‍यांची नावं दडवायचा प्रयत्न सरकार करतंय असा जाहीर आरोप भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी केला. ही नावं जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. औरंगाबाद इथं प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत गडकरींनी केद्र सरकारमधील गैरव्यवहारांवर तोफ डागली. याच सभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील माफियांराजवर जोरदार हल्लाबोल केला.अशोक चव्हाण गैरव्यवहारांनतही शक्तीप्रदर्शन करीत असतील तर ते गैरव्यवहाराचे समर्थनच ठरते असं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची आजही औरंगाबाद शहरात बैठक होत आहे.

close