इजिप्तचे उपराष्ट्राध्यक्ष जीवघेण्या हल्ल्यातून बचावले

February 5, 2011 10:34 AM0 commentsViews: 3

05 फेब्रुवारी

इजिप्तमधील परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. इजिप्तचे उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलेमान त्यांच्यावरच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले आहेत. पण या प्राणघातक हल्ल्यात सुलेमानचे दोन बॉडीगार्ड ठार झाले आहेत. हिंसक होत चाललेली परिस्थिती पाहून मुबारक यांनी सुलेमान यांची नुकतीच नियुक्ती केली होती. इजिप्तमधल्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना पायउतार होण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपली. पण मुबारक यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. 'डे ऑफ डिपार्चर' म्हणून ओळखलं गेलेलं आंदोलन काल शांततेत पार पडलं. पण आता या तहरीर चौकामध्ये गोळीबार सुरू असल्याची बातमी आहे. आपण राजीनामा दिला तर देशात यादवी माजेल असा दावा मुबारक यांनी केला होता. मुबारक यांचे विरोधक तहरीर चौकात लाखोंच्या संख्येनं जमले आहे. त्यांनी मुबारक यांच्या राजवाड्याच्या दिशेनं मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्याही मोठी आहे. तहरीर चौकाजवळच्या हॉटेलच्या गॅलरीतून फोटो काढणार्‍या अहमद महमूद या इजिप्शियन रिपोर्टरवर गोळीबार करण्यात आला होता. 28 जानेवारीच्या या गोळीबारात महमूद जखमी झाला होता. त्याचा काल मृत्यू झाला.

close