अहमदनगरमध्ये वाळू तस्करांवर छापा; 50 लाखांचा ऐवज जप्त

February 5, 2011 11:28 AM0 commentsViews: 4

05 फेब्रुवारी

गोदावरी नदीतून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर छापा टाकुन 50 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या पुणतांब्यामध्ये हा छापा टाकण्यात आला. पाणी असताना पंपाच्या सहाय्यानं नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा करण्यात येत होता. या तस्करीविरोधात प्रांताधिकारी आणि अप्पर पोलिस अधिक्षक यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी ट्रक, ट्रॅक्टर, पंप आणि वाळू असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोघांना अटक करण्यात आली.

close