कर्मचारी युवतीवर बलात्कार करणार्‍या इंजिनिअरचा जामीन अर्ज फेटाळला

February 5, 2011 11:39 AM0 commentsViews: 6

05 फेब्रुवारी

नाशिकमध्ये सेंट्रल पी डब्ल्यू डीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किशोर वहाणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या युवतीवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी ते अटकपूर्व जामीन घेण्यासाठी कोर्टात आले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यानं हे गैरकृत्य केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान कोर्टानं आज वहाणे यांचा जामीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

close