माजी सरपंचाची वृद्ध महिलेला बेदम मारहाण

February 5, 2011 12:17 PM0 commentsViews: 13

05 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातल्या पोंडेवाडीत किरकोळ वादातून माजी सरपंचानं एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नारायण हारके असं या माजी सरपंचाचं नाव आहे. त्यानं कलाबाई हारके या महिलेला दगड आणि चाबकानं मारहाण केली. मात्र 10 दिवसानंतरही त्याला अटक कऱण्यात आली नाही. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारालाच अटक करण्याचा प्रताप मंचर पोलिसांनी केला. हारके फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

close