नागपूरमध्ये काल्सबर्ग आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला सुरूवात

February 5, 2011 12:38 PM0 commentsViews: 5

05 फेब्रुवारी

नागपूरच्या स्मृती सिनेमागृहात काल्सबर्ग आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची सुरूवात झाली. या फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन प्रसिध्द गायक, संगीतकार आणि कलावंत लेसल लेविस यांच्या हस्ते करण्यात आलं. चार ते दहा फेब्रवारी दरम्यान हा फिल्म फेस्टिवल चालणार आहे. या महोत्सवात अनेक आंतरराष्टीय चित्रपटासह प्रादेशिक चित्रपटाची पर्वणी रसिकांना पाहता येईल. या महोत्सवात अनेक दिग्गज कलावंत हजेरी लावणार आहेत. तसेच हे दिग्गज रसिकांशी संवादही साधणार आहेत. या महोत्सवाची सुरूवात थ्री मंकिज या चित्रपटाने झाली. एकूण चौदा शॅार्ट फिल्म या महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येणार आहेत. या शिवाय नागपूरकरांनी बनविलेला द्वंद हा चित्रपट महोत्सवाचं खास आकर्षण असेल.

close