मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

November 4, 2008 2:08 PM0 commentsViews: 5

4 नोव्हेंबर, मुंबईगेल्या अनेक वर्षांपासून नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या राजू अढांगळेनं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात रहाणारा राजू अढांगळे आपल्या कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांकडे नोकरी मागण्याकरता आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यामुळे राजूनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला वेळीचं अडवलं. ' या प्रकारच्या घटना घडू नयेत, म्हणून योग्य ती पावलं उचलली पाहिजेत ',असं काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.

close