आदर्श प्रकरणी तिसर्‍या दिवशीही सीबीआय चौकशी सुरू

February 5, 2011 1:03 PM0 commentsViews: 2

05 फेब्रुवारी

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी आज पुन्हा क न्हैय्यालाल गिडवानी, एम.एम. वांच्छू आणि आर.सी. ठाकूर यांची तिसर्‍या दिवशीही सीबीआय चौकशी सुरु आहे. या तिघांची आज सकाळी 11 पासून चौकशी सुरु आहे. काल या तिघांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. तर गुरुवारी यांची तब्बल 10 तास चौकशी झाली होती. आदर्श घोटाळ्याप्रकरणी या तिघांचीही सीबीआय चौकशी करतं आहे. आठवड्याच्या सुरवातीला सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयनं धाडीही टाकल्या होत्या. त्यानंतर सीबीआयने चौकशी सुरु केली. दरम्यान, आदर्शच्या तपासाबाबत सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं गिडवाणी यांनी सांगितंले आहे.

close